डोकेदुखी, थोडा ताप किंवा सर्दी-खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी थेट मेडिकलमधून औषधं घेतात. सुरुवातीला ही सवय साधी वाटत असली तरी आता ती आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. भारतातील जवळपास ६१.१ टक्के लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधं घेत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
संशोधन ‘बीएमसी पब्लिक हेल्थ’मध्ये प्रसिद्ध
हे संशोधन आंतरराष्ट्रीय रिसर्च जनरल ‘बीएमसी पब्लिक हेल्थ’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधनानुसार, स्वतःच्या मनाने औषधं घेण्याचे प्रमाण तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक आहे. या गटातील तब्बल ७४ टक्के लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतात.
मध्य प्रदेशातील परिस्थिती चिंताजनक
राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्येही परिस्थिती चिंताजनक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
Leave a Reply