भारतात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 12,781 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 11,716 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 9,586 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅमच्या हिशेबाने 24 कॅरेट सोने 1,27,810 रुपये, 22 कॅरेट सोने 1,17,160 रुपये आणि 18 कॅरेट सोने 95,860 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति ग्रॅम 174.90 रुपये, तर प्रति किलोग्रॅम 1,74,900 रुपये आहे.
कालच्या तुलनेत किती वाढ?
24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,26,570 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,16,010 रुपये होता. 18 कॅरेट सोने 94,920 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यामुळे एका दिवसात 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,240 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोने 1,150 रुपयांनी महागले आहे. चांदीचा भाव मात्र कालच्याच पातळीवर, म्हणजे प्रति ग्रॅम 174.90 रुपये इतकाच राहिला आहे.
मोठ्या शहरांतील आजचे दर
नागपूर, मुंबई, पुणे आणि चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,17,160 रुपये, 24 कॅरेट सोने 1,27,810 रुपये आणि 18 कॅरेट सोने 95,860 रुपये आहे. दिल्ली आणि चंदीगडमध्ये दर थोडे जास्त आहेत. तिथे 22 कॅरेट सोने 1,17,310 रुपये, 24 कॅरेट सोने 1,27,910 रुपये आणि 18 कॅरेट सोने 96,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सुरतमध्ये 22 कॅरेट सोने 1,17,160 रुपये, 24 कॅरेट सोने 1,26,610 रुपये आणि 18 कॅरेट सोने 94,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Leave a Reply