राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरलंय ठाकरेसेनेच्या नगराध्यक्षाची शिंदेसेनेच्या बैठकीतली उपस्थिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलावलेल्या शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांच्या विशेष बैठकीला ठाकरेसेनेचे कोकणातील नेते आणि सिंधुदुर्गचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.
६३ नगराध्यक्षांची बैठक
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिंदेसेनेच्या ६३ नगराध्यक्षांची बैठक बोलावली होती. नगराध्यक्षांना येणाऱ्या अडचणी समजून घेणं, महायुतीत संवाद ठेवणं हे या बैठकीचे उद्दिष्ट होते. या बैठकीला ठाकरेसेनेच्या नेत्याची उपस्थिती असल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Leave a Reply