आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न देशातील कोट्यवधी तरुण-तरुणी पाहतात. मात्र फारच मोजक्या लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. त्यामुळे आयएएस झालेल्या व्यक्तीला समाजात वेगळा मान आणि सन्मान मिळतो. अशा अधिकाऱ्यांचे करिअर तसेच वैयक्तिक आयुष्यही तेवढेच चर्चेत असते. सध्या दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे.
२० नोव्हेंबर रोजी झाला विवाह
आयएएस अधिकारी पल्लवी मिश्रा आणि आयएएस अधिकारी डॉ. आदित्य शर्मा यांचे २० नोव्हेंबर रोजी लग्न झाले. पल्लवी मिश्रा या २०२३ सालच्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून सध्या अमृतसरमध्ये असिस्टंट कमिश्नर म्हणून कार्यरत आहेत. डॉ. आदित्य शर्मा हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. पल्लवी मिश्रा यांनी काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर विवाहाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना शेकडो लाइक्स मिळाले असून थाटामाटात झालेल्या या विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या विवाहाच्या फोटोंची सगळीकडेच चर्चा होत आहे.
दोघांचीही उल्लेखनीय वाटचाल
पल्लवी मिश्रा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून बीए एलएलबी (ऑनर्स) चे शिक्षण घेतले आहे. यूपीएससी परीक्षेत त्यांना २०२२ साली दुसऱ्या प्रयत्नात यश आले आणि त्यांना ७३ वा रँक मिळाला होता. आदित्य शर्मा यांनी यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले; त्यांचा ऑल इंडिया रँक ७० होता. ते २०२३ सालच्या बॅचचे पंजाब केडरमधील आयएएस अधिकारी आहेत. दोघांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. पल्लवी यांचा भाऊ एसपी असून त्यांचे वडील डीएसपी राहिलेले आहेत.
Leave a Reply