ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार राहू नेहमी उलट्या दिशेने भ्रमण करतो. येत्या ५ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी राहू कुंभ राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही शनीची रास मानली जाते आणि राहू व शनी यांच्यात मैत्रीचे नाते असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. त्यामुळे या गोचराचा परिणाम सर्वच राशींवर जाणवेल. काही राशींसाठी हा काळ शुभ ठरू शकतो, तर काहींना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. मात्र, तीन राशींसाठी हा बदल विशेष लाभदायी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या तीन राशींना मिळू शकतो लाभ
सिंह रास: सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मकर राशीतील राहूचे गोचर फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामे सहजपणे मार्गी लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी मोठी डील मिळू शकते किंवा चांगला नफा होऊ शकतो. आर्थिक स्थितीही मजबूत राहण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक रास: वृश्चिक राशीसाठी हे गोचर सकारात्मक मानले जात आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असल्याचे सांगितले जाते. विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. व्यवसायातील नफा वाढवण्यासाठी आखलेल्या योजना यशस्वी होण्याचे संकेत आहेत.
मीन रास: मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे हे संक्रमण अनुकूल ठरू शकते. आईसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि घरातील वातावरण चांगले राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मोठ्या त्रासापासून दिलासा मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत.
गोचरादरम्यान कोणता उपाय करावा?
राहू मकर राशीत गोचर करत असताना देवी दुर्गेची विधिवत पूजा करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दुर्गा मातेची आराधना केल्याने राहूच्या प्रतिकूल प्रभावापासून संरक्षण मिळण्यास मदत होते, असे सांगितले जाते.
ही माहिती ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. यातील दाव्यांची पुष्टी करता येत नाही.
Leave a Reply