सोन्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होताना दिसत आहे. मागील काही दिवसांचा विचार करता सोन्यात घसरण झाली आहे. एका महिन्यात सोने एक तोळा तब्बल १८,५३० रुपयांनी स्वस्त झाले आहे. देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात एका महिन्यात १३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. २३ ऑक्टोबरला १० ग्रॅम सोन्याचा दर १,४५,४३० रुपये होता. अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे, पण सोन्याचे भाव अजून कोसळणार की वाढणार, याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत.
तज्ज्ञांचा इशारा काय?
सोन्याचे दर अमेरिकेतील आर्थिक गोष्टींवर अवलंबून आहेत. २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान अमेरिकेतील महागाई आणि रोजगार यांची आकडेवारी जाहीर होईल. त्यावर सोन्याचे भविष्य ठरवले जाईल, असे सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांत सोन्याचे भविष्य ठरणार असल्याने तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. या घसरणीमुळे सोने खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. त्यातच कोटक निओचे कमोडिटी आणि करन्सी प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांच्या मते सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. जानेवारी २०२७ मध्ये सोने निचांकी गाठण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काल भावात वाढही झाली
दरम्यान, घसरणीच्या या काळातही काल सोन्याचा भाव अडीच हजारांनी वाढला होता. त्यामुळे सोन्याच्या दरातील चढ-उतार कायम आहे. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली असून पुढील काही दिवसांतील अमेरिकेतील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply