पुणे महानगरपालिका सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. शहरात ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांविरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सलग सहाव्या दिवशीही सुरूच असून सोमवारी शहरातील नामांकित हॉटेल्स आणि चौपाट्यांना लक्ष्य करण्यात आले.
नामांकित हॉटेल्स आणि चौपाट्यांवर हातोडा
तरुणांचे कट्टे बनलेल्या हॉटेल्समधील अतिक्रमणेही प्रशासनाने हटवली. फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे काढून टाकण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे रस्ते मोकळे होत असून नागरिकांना दिलासा मिळत आहे.
सहा दिवसांत लाखो चौरस फूट जागा मोकळी
या सहा दिवसांच्या मोहिमेत आतापर्यंत तब्बल २ लाख ५ हजार ८०० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे. शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. अतिक्रमणांमुळे अडथळा निर्माण होणाऱ्या ठिकाणी ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.
Leave a Reply