सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री माऊली देवीच्या वार्षिक उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली गावात मंदिर परिसरात व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
## बुधवारी लोंटागण जत्रा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी जत्रा म्हणून श्री देवी माऊलीची लोंटागण जत्रा ओळखली जाते. यंदा बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव साजरा होत आहे. उत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी देवस्थान कमिटी प्रयत्न करत आहे.
## गावात धार्मिक वातावरण
उत्सवानिमित्त संपूर्ण गावात धार्मिक वातावरण तयार झाले आहे. मंडप आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर झळाळून निघाला आहे.
Leave a Reply