एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या (डीएमईआर) अंतर्गत नर्स भरती प्रक्रियेतील ८०:२० च्या तरतुदीवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या भरतीत ८० टक्के जागा महिलांसाठी, तर २० टक्के जागा पुरुषांसाठी असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. नोकरीत लिंगभेद नको, महिला आणि पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले.
२८८ आमदारांना निवेदने
आपापल्या मतदारसंघातील २८८ आमदारांना लेखी निवेदन देऊन ही तरतूद रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
२०२५ पासून पाठपुरावा, निर्णय नाही
२०२५ पासून मंत्रालयात अनेकदा पाठपुरावा करूनही याबाबत निर्णय झाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक नेत्यांनी आश्वासने दिली, मात्र त्यांची पूर्तता झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देत नसल्याची खंतही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Leave a Reply