पुणे शहरातील रिक्षा चालकांनी पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा संघटनांनी मागे घेतल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक
दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रिक्षा संघटनांनी हा निर्णय घेतला. अनधिकृत बाईक टॅक्सीच्या मुद्द्यावरून रिक्षा चालक आणि मालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
अनधिकृत बाईक टॅक्सीविरोधात कारवाईचे आश्वासन
बैठकीदरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांनी अनधिकृत बाईक टॅक्सीविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन रिक्षा संघटनांना दिले.
Leave a Reply