आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन आणि पोटाची चरबी ही अनेकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. बेली फॅट कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय शोधत असतात. अशातच आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सुचवलेला एक घरगुती उपाय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतो. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कधीकधी इच्छा असूनही लोकांना वजन कमी करता येत नाही आणि त्यासाठी ते जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. मात्र घरच्या घरी करता येईल असा हा आयुर्वेदिक उपाय जाणून घेणे उपयुक्त ठरू शकते.
लवंग, दालचिनी आणि जिरे यांचे फायदे
वजन कमी करण्यासाठी लवंग, दालचिनी आणि जिरे लागतात. लवंग हा जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा सामान्य घटक आहे. त्यामुळे पदार्थांना चव येते, शिवाय लवंग शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठीही प्रभावी मानली जाते. लवंगामध्ये जीवनसत्त्वे ए, के, ई, प्रथिने आणि फायबर असतात. दालचिनी वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते आणि लवंगांप्रमाणेच चयापचयाचा वेग वाढवते. जिरे पोटासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते पचनक्रिया सुधारते आणि चरबी कमी करण्यास मदत करते. जिऱ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते, असे मानले जाते.
हा उपाय कसा तयार करावा
हा उपाय तयार करण्यासाठी लवंग, दालचिनी आणि जिरे समान प्रमाणात घ्यावेत. हे तिन्ही घटक वाटून घ्यावेत. यानंतर पावडर गाळून घ्यावी आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवावी. ही पावडर एक चमचा घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये घालून उकळवावी आणि ते पाणी थंड करून प्यावे.
Leave a Reply