दक्षिण भारतातील तामिळनाडू हे मंदिरांची भूमी म्हणून ओळखले जाते. या राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. येथील काही ठिकाणं निसर्गसौंदर्य, शांत वातावरण आणि ऐतिहासिक वारशामुळे स्वर्गाहूनही सुंदर वाटतात. उटी, कुन्नूर, कन्याकुमारी आणि महाबलीपुरम ही चार ठिकाणं प्रवाशांसाठी खास आकर्षण ठरतात.
उटी आणि कुन्नूर – डोंगरातील थंडवा
उटी हे हनिमूनसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या शहराला डोंगराची राणी म्हटलं जातं. १९४८ साली स्थापन झालेलं बॉटनिकल गार्डन आजही पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. उटीला पोहोचल्यानंतर कुन्नूर शहरालाही भेट देता येते. कुन्नूर ते उटीदरम्यान एक टॉय ट्रेन धावते आणि पर्यटकांचा या ठिकाणी मोठा ओढा असतो. डोंगर, हिरवळ आणि थंड हवामान यामुळे ही दोन्ही ठिकाणं मनाला शांतता देतात.
कन्याकुमारी आणि महाबलीपुरम – समुद्र आणि इतिहास
कन्याकुमारी हे प्रसिद्ध शहर आहे. येथे तीन समुद्रांचा संगम होतो. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर या तीन समुद्रांचा संगम कन्याकुमारीत पाहायला मिळतो. समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी होते. महाबलीपुरम हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहर पल्लव राजांची राजधानी मानलं जातं. महाबलीपुरम शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतही समाविष्ट आहे. त्यामुळे इतिहासात रस असणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण खास आहे.
तामिळनाडूच्या प्रवासाचं नियोजन करताना ही चारही ठिकाणं यादीत नक्की ठेवा. मंदिरं, डोंगर, समुद्र आणि इतिहास यांचा एकत्र अनुभव येथे मिळतो.
Leave a Reply