पुण्यातील सय्यदनगर-हांडेवाडी परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दगडफेकीची घटना घडली. कारवाईला विरोध करत काही जणांनी अधिकाऱ्यांवर दगडफेकीचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जेसीबीवरही दगडफेक
अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाचे पथक जेसीबी मशीन घेऊन परिसरात दाखल झाले होते. कारवाई सुरू करण्याची तयारी सुरू असतानाच काही स्थानिकांनी विरोध केला. त्यानंतर काही जणांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर दगडफेकीचा प्रयत्न केला आणि जेसीबीवरही दगड फेकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला.
पोलिसांचा हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पुणे शहरात सध्या सगळीकडे अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असून, या घटनेनंतर पुढील कारवाई काय होणार आणि मोहीम पुन्हा सुरू होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply