प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांनी शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या रिसेप्शननंतर रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी चेन्नईत आणखी एक रिसेप्शन ठेवले. आधीच्या संध्याकाळप्रमाणे रविवारचे सेलिब्रेशनही स्टार्सने सजलेले होते. या दुसऱ्या रिसेप्शनसाठी दोघांनी वेगळे लुक निवडले. सध्या सगळीकडे काव्याच्या या लूकची चर्चा रंगली आहे.
पांढरा गाऊन आणि मोती-चांदीचे काम
शनिवारी हाय-नेक डार्क रेड ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधल्यानंतर, रविवारच्या रिसेप्शनसाठी काव्याने फ्लोअर टच व्हाईट गाऊन घातला. या ड्रेसवर चांदी आणि पांढऱ्या मोत्यांचे बारीक काम, सिक्विन्स आणि थ्रीडी फुलांची एम्ब्रॉयडरी होती, जी त्याला एक शानदार आणि चमकदार लुक देत होती. काव्याच्या या गाऊनची किंमत किती आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्याने या गाऊनसोबत डायमंड चोकर घातला आणि बाकी अॅक्सेसरीज खूप साध्या ठेवल्या. संगीतकार अनिरुद्धने सॅटिन पीक लॅपल्स असलेला एक शानदार पांढरा ब्लेझर घातला होता. तो त्यांनी ब्लॅक ट्राऊझरसोबत मॅच केला.
स्टार स्टडेड गेस्ट लिस्ट
लुकव्यतिरिक्त पाहुण्यांबद्दल बोलायचे झाल्यास गेस्ट लिस्ट स्टार स्टडेड होती. पाहुण्यांमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा समावेश होता, जे एकत्र पोहोचले आणि नव्या जोडप्यासोबत फोटो काढले. याशिवाय नयनतारा आणि विग्नेश शिवन, राम्या कृष्णन, सुपरस्टार रजनीकांत आणि अजीत कुमारही या उत्सवात उपस्थित होते. क्रिकेटर एमएस धोनीही या रिसेप्शनला उपस्थित होते. एटली, लोकेश कनगराज, नेल्सन दिलीपकुमार आणि शंकरही नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद देणाऱ्या पाहुण्यांमध्ये होते. सांगण्यात येते की, या जोडप्याने ११ नोव्हेंबरला ग्रीसमध्ये एका खासगी समारंभात लग्न केले होते.
Leave a Reply