गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाली येत असलेल्या सोन्याच्या दराने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार उसळी घेतली आहे. सोमवारी सोने एकाच दिवसात तब्बल २,००० रुपयांनी महागले. त्यामुळे सोने लवकरच एक लाख रुपयांच्या आत येईल, असा अंदाज व्यक्त करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
## मुंबई-दिल्लीतील आजचे दर
मुंबईत आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२५,०७० रुपये झाले आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,१४,६४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,२२० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,१४,७९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे.
## जागतिक घडामोडींचा परिणाम
जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होताना दिसत आहे. काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत होती. मात्र सोमवारी सोन्याने पुन्हा मान वर काढली आहे. खरेदीदारांसाठी ही वाढ महत्त्वाची ठरणार आहे, कारण सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
Leave a Reply