कपडे धुतल्यानंतर ते किती वेळात वाळत घालावेत, याबद्दल अनेकांना संभ्रम असतो. कपडे धुतल्यानंतर ते जास्त वेळ बादलीत किंवा वॉशिंग मशीनमध्ये ठेवल्यास त्यांना कुबट वास येऊ शकतो. ओलसर आणि बंद जागेत कपडे ठेवल्यामुळे त्यांच्यावर बुरशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकतं.
ओले कपडे रात्रभर ठेवू नका
ओले कपडे रात्रभर बादलीत किंवा मशीनमध्ये ठेवल्यास सकाळपर्यंत त्यांना उग्र वास येऊ शकतो. कपड्यांमध्ये ओलावा जास्त वेळ राहिल्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्याची शक्यता असते. अशा कपड्यांना वास येत असल्यास ते पुन्हा धुऊन वाळत घालावेत. त्यामुळे धुतलेले कपडे जास्त वेळ तसेच न ठेवता लवकर वाळत घालावेत.
Leave a Reply