‘झिम्मा ३’चा टीझर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात यंदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत महिलांच्या सहलीतून रंगलेला ‘झिम्मा’चा प्रवास आता पुरुषांच्या भन्नाट टोळीसोबत श्रीलंकेत पोहोचणार आहे.
यंदा बॉइज ट्रिप
यंदा ‘झिम्मा ३’मध्ये बॉइज ट्रिप पाहायला मिळणार असून, श्रीलंकेत या सहलीत नेमकी कोणती धमाल रंगते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हेमंत ढोमे यांच्या पुनरागमनासह सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांच्यासह नवी टोळी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
टीझर पाहून हसू आवरणार नाही, असा या चित्रपटाचा अंदाज आहे.
Leave a Reply