रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगावात सफाई मक्तेदारावर सभापतींचा संताप

जळगावात साफसफाईचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीवर स्थायी समितीत नाराजी व्यक्त झाली. काम असमाधानकारक असतानाही मक्ता रद्द का होत नाही, असा सवाल सभापतींनी केला.

जळगावात सफाई मक्तेदारावर सभापतींचा संताप

जळगाव शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम करणाऱ्या मक्तेदार कंपनीच्या कामकाजावरून स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काम असमाधानकारक असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतानाही प्रशासन मक्ता रद्द का करत नाही, असा थेट सवाल स्थायी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी अधिकाऱ्यांना केला.

स्थायी समितीची ही बैठक सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, संजय राऊत, नगरसचिव मनोज शर्मा, शहर अभियंता आर. टी. पाटील, मुख्य लेखाधिकारी राजू लाकुडझोडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय घेण्यात आला. तसेच १२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यानच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांचा अद्ययावत अहवाल, ऑगस्ट महिन्यातील अग्निशमन विभागाचा आगीच्या घटनांचा अहवाल आणि साप्ताहिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती घेण्यात आली.

वॉटर मीटरवरूनही प्रश्न

बैठकीत नळांना बसवण्यात येणाऱ्या वॉटर मीटरबाबतही प्रश्न उपस्थित झाले. मीटर बसवण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याची आणि कमी दाब येत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत स्थायी सदस्य अॅड. पोकळे यांनी पुढील बैठकीत या मीटरच्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा आणि माहिती सभेपुढे सादर करण्याची सूचना केली.

मक्ता रद्द का होत नाही?

कचरा संकलनासाठी क्यूआर कोड स्कॅनचे काम किती होत आहे, यावरही बैठकीत चर्चा झाली. कचरा संकलन करताना कर्मचारी माती आणि दगड भरून कचऱ्याचे वजन वाढवत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीत अचानक कचरा संकलनात वाढ कशी झाली, याबाबत विष्णू भंगाळे, अॅड. दिलीप पोकळे, नितीन सपके, दिपक सूर्यवंशी आणि नितीन लड्डा यांनी विचारणा करत संताप व्यक्त केला. त्यावर उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी मक्तेदाराकडून अतिरिक्त वाहने लावल्याने कचरा संकलनात वाढ झाल्याचे सांगितले.

मात्र, काम समाधानकारक नाही असे वारंवार सांगितले जात असतानाही मक्ता का रद्द केला जात नाही, असा सवाल सभापती डॉ. पाटील यांनी केला. अधिकारी सभेत उपस्थित राहतात, परंतु कोणतीही कार्यवाही करत नाहीत, तर ते सभेत का उपस्थित राहतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आयुक्त स्थायी सभेत का उपस्थित राहत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance