पुण्यात सकाळ माध्यम समूहाच्या पेटोपिया या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजन करण्यात आले आहे. पाळीव प्राण्यांबाबत गोडी आणि लळा निर्माण व्हावा, तसेच पाळीव प्राण्यांचे हक्क समजून घेता यावेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवता यावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला पुणेकरांनी सलग दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी केली.
डॉग शो, अश्वरोहण स्पर्धा आणि अॅक्वा झोन
या कार्यक्रमात डॉग शो, अश्वरोहण स्पर्धा, अॅक्वा झोनमधील विदेशी मासे आणि मांजरीच्या विविध प्रजाती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घोड्यांची शर्यत आणि विदेशी माशांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. शनिवारची सुट्टी साधत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशीही उत्साह कायम
पेटोपियाच्या दुसऱ्या दिवशीही पुणेकरांचा उत्साह कायम राहिला. पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्रजाती जवळून पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. कुटुंबासह आलेल्या अनेकांनी या आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद घेतला.
Leave a Reply