हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तुळशीजवळ काही गोष्टी ठेवू नयेत, असे सांगितले जाते.
काटेरी झाडे लावू नयेत
तुळशीभोवती गुलाब किंवा इतर कोणतीही काटेरी झाडे लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या जवळ काटेरी झाडे असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते, अशी मान्यता आहे.
कचरा, अस्वच्छ भांडी आणि पादत्राणे ठेवू नयेत
तुळशीच्या आजूबाजूला कचरा, अस्वच्छ भांडी आणि पादत्राणे ठेवू नयेत. तुळशीचे ठिकाण स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे मानले जाते.
Leave a Reply