वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज २१ नोव्हेंबर २०२६ हा शनिवार आहे. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित मानला जातो. आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करतात आणि आपल्या चुकांची माफी मागतात. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीनेही आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे मेष ते मीन या बारा राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल, ते पाहूया.
मेष ते कर्क
मेष: आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करता येतील. मात्र व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबाशी संबंधित काही समस्या भेडसावू शकतात. खर्चातही वाढ होईल, त्यामुळे बजेट सांभाळून व्यवहार करा.
वृषभ: आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. आई-वडिलांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे कोणतेही काम संयमाने करा. प्रतिस्पर्ध्यांशी सांभाळून व्यवहार करा.
मिथुन: आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. कामातून मनासारखे परिणाम न मिळाल्याने मन थोडे विचलित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान लाभेल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. मित्रांशी चांगले संबंध निर्माण होतील.
कर्क: आजचा दिवस मानसिक शांतीचा असेल. कामातून समाधान मिळेल. प्रेमजीवनातील रुसवे-फुगवे कमी होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.
सिंह ते मीन
सिंह: नशिबाची चांगली साथ मिळेल. जे कार्य हाती घ्याल ते नेटाने पार पाडाल. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. कोणाच्या वादात पडू नका. आज मन थोडे विचलित होऊ शकते.
कन्या: आजचा दिवस चांगला असणार आहे. करिअरची नवी दिशा मिळेल. मेहनतीला चांगले फळ मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या मुद्द्यावर विनाकारण चर्चा करू नका.
तूळ: आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिनचर्येत काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. नकारात्मक ऊर्जा असणाऱ्यांच्या संपर्कात राहू नका. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा.
वृश्चिक: आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळू शकते. रखडलेली कामेही पूर्ण करता येतील.
धनु: आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची वाईट नजर असू शकते. कोणत्याही कामात दिरंगाई करू नका. समाजात मान-सन्मान टिकून राहील. कामानिमित्त प्रवास सुरू राहील.
मकर: शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करू नये. धनहानीचे संकेत मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. व्यवसाय सुरळीत चालेल, मात्र त्यात ना लाभ ना तोटा मिळेल.
कुंभ: आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण जसजसा वेळ निघत जाईल तसे बेचैन वाटेल. मनात अनेक प्रश्न निर्माण होतील, मात्र एकाचेही उत्तर मिळणार नाही.
मीन: आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र तरीही पैशांचा अतिवापर करू नका. महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
टीप: वरील माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहिती म्हणून दिली आहे. यात कोणताही दावा केला जात नाही.
Leave a Reply