मुंबईला आणखी एक कोस्टल रोड मिळणार आहे. दक्षिण मुंबईपासून थेट पालघरपर्यंत जाणारा हा मार्ग सुमारे १०० किलोमीटर लांबीचा असेल. या मार्गावर दोन भुयारी मार्ग आणि पाच इंटरचेंज उभारले जाणार आहेत.
समुद्रातील सी लिंकऐवजी किनाऱ्यालगतचा मार्ग
याआधी उत्तन-विरार दरम्यान समुद्रातून सी लिंक उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी तब्बल ५८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. इतका मोठा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने तो प्रस्ताव मागे पडला. त्याऐवजी आता समुद्राला लागून किनाऱ्यालगत हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च ३८ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे.
प्रवास होणार वेगवान
हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईहून थेट पालघरपर्यंत विनाथांबा प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पाची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply