उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चार परिसरातील महादेव नगर येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. ३२ वर्षीय सूरज हा ऑर्डर पोहोचवण्यासाठी दुचाकीवरून निघाला असताना ट्रकच्या बाजूने जाताना त्याची दुचाकी घसरली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
महिनाभरानंतर कामावर परतला होता
सूरज हा घरातील एकमेव कमावता सदस्य होता. अख्ख्या घराची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर होती. महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर घराची जबाबदारी लक्षात घेऊन तो पुन्हा कामावर जायला निघाला होता. मात्र कामाचा पहिलाच दिवस त्याच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
घराचा एकमेव आधार हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Leave a Reply