दिंडोरी : तालुक्यातील चाचडगाव शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह कार जप्त केली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गुटख्यावर राज्यात बंदी असूनही त्याची तस्करी सुरूच आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply