भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. टीम इंडियाने या सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. सामन्यादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने केएल राहुलविरुद्ध डीआरएस घेतला नाही. त्यामुळे गोलंदाज मॅट हेनरी चिडला. बाऊंड्री लाइनवर त्याने आपला स्वेटर फेकला. त्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
डीआरएस न घेतल्याने हेनरी संतापला
केएल राहुलविरुद्ध डीआरएसची संधी असतानाही कर्णधाराने तो घेतला नाही. यामुळे मॅट हेनरी नाराज झाला आणि त्याने बाऊंड्री लाइनवर स्वेटर फेकून आपली नाराजी व्यक्त केली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
Leave a Reply