सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. २० नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ६ हजार रुपये, तर चांदीच्या दरात १० हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.
घसरणीनंतर सोन्याचा दर जीएसटीसह एक लाख २८ हजार ५०० रुपये इतका झाला आहे. चांदीचा दर जीएसटीसह एक लाख ५९ हजार ६५० रुपये आहे. हा वर्षभरातील सगळ्यात स्वस्त दर असल्याचे सांगितले जात आहे.
दहा दिवसांत मोठी घसरण
गेल्या काही दिवसांपासून दागिन्यांच्या किमतीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या दहा दिवसांत सोने १८ हजार ३०० रुपयांनी घसरले आहे. याच काळात चांदी ३४ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
किमतीत झालेली ही घसरण खरेदीदारांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सध्याचा दर आकर्षक ठरू शकतो. मात्र दरात पुढे कसे बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply