पुणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात मोठी संघटना उभी करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली पुण्यात शिवसेना एवढी ताकदवान करू की भविष्यात आमदार-खासदार निवडून येण्यासाठी आमच्या संघटनेचा विचार करावा लागेल, असे उदय सामंत म्हणाले.
भाजपबाबत सामंत काय म्हणाले?
भाजपने धोका दिल्याचा आरोप न करता, प्रत्येक पक्षाला स्वतःची संघटना वाढवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन टायगर’ या नावावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. या नावामुळे गैरसमज होत असल्याने आम्ही नाव बदलण्याच्या मनस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीतील कटुता आणि इतर मुद्दे
साताऱ्यातील महायुतीतील कटुता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार दूर करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीच्या अहवालानंतर बोलणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले. त्याचसोबत मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत एमआयडीसी स्तरावर निर्णय अंतिम झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
Leave a Reply