शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बारामती विमानतळाचा कायापालट; १३२ कोटींचा निधी मंजूर

बारामती विमानतळाच्या विकासासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. धावपट्टी व सुरक्षा व्यवस्थेची कामे होणार असून, कामाला कधी सुरुवात होणार हे अद्याप स्पष्ट नाही.

बारामती विमानतळाचा कायापालट; १३२ कोटींचा निधी मंजूर

बारामती विमानतळावर झालेल्या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर या विमानतळातील त्रुटी चर्चेत आल्या होत्या आणि तिथे उपाययोजना करण्याची मागणी होत होती. आता या विमानतळाचा कायापालट करण्यासाठी १३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाला दहा महिने पूर्ण होत आहेत.

निधी कशासाठी वापरणार?

मुख्य सचिवांच्या शक्ती प्रदत्त समितीने हा प्रस्ताव मांडला होता. विमानतळाच्या संचालन विकास व पायाभूत सुविधांसाठी ६४ कोटी रुपये, तर विमानतळ चालवण्यासाठी ६८ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. धावपट्टीसह सुरक्षा विभागाच्या कामांचा यात समावेश आहे. फायर क्रॅश फोमसह सुरक्षा भिंतही उभारली जाणार आहे. हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे देण्यात आले आहे.

विमानतळाची ओळख

बारामती विमानतळ हे प्रादेशिक विमानतळ असून, बारामती शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. तिथे खासगी उड्डाणे आणि वैमानिक प्रशिक्षणासाठी त्याचा वापर केला जातो. हे विमानतळ १९९६ साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधले होते. त्याची धावपट्टी ५,५०० बाय १०० फूट लांबी-रुंदीची आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबरला हे विमानतळ एमआयडीसीकडून हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र या कामाला प्रत्यक्षात कधीपासून सुरुवात होणार, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance