मुंबईत उपचार घेतल्यानंतर घरी विश्रांती घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. उद्या ते पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे होणाऱ्या राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी शरद पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे तिघे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज असतील.
विलिनीकरणाची चर्चा थांबली
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मात्र आता ती थांबलेली दिसते. अशा पार्श्वभूमीवर तिन्ही नेते एकाच मंचावर येत असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. उपचारानंतरचा शरद पवार यांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असल्याने त्याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
Leave a Reply