हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक रे टिंटोरी यांचे वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी निधन झाले आहे.
निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट
रे टिंटोरी यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. न्यूयॉर्कमध्ये त्यांचे निधन झाले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोक
रे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक म्युझिक व्हिडिओ, लघुपट आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ते ‘कोर्ट १३’ या फिल्म कलेक्टिव्हचे संस्थापक सदस्यही होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply