गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

थंडीत दुधी-शेवगा सूप: सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक रेसिपी

थंडीच्या दिवसांत सकाळच्या नाश्त्यात तिखट किंवा तेलकट पदार्थांऐवजी दुधी भोपळा आणि शेवग्याचे सूप प्या. पचनाला हलके आणि पोषक हे सूप शरीराला उबदारपणा देईल.

थंडीत दुधी-शेवगा सूप: सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक रेसिपी

राज्यासह संपूर्ण देशभरात थंड वारे वाहू लागले आहेत. थंड वातावरणात शरीराची जास्त काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्यात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सूप किंवा शरीरात उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खाल्ले जातात. नेहमीच टोमॅटो सूप खाऊन कंटाळा आल्यास काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी झटपट दुधी भोपळा आणि शेवग्याचे सूप बनवता येते. दुधी भोपळा शरीरासाठी फायदेशीर आहे. हा पदार्थ पचनाला अतिशय हलका आणि पोटासाठी आरामदायी आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तिखट किंवा चहा-बिस्कीट खाण्याऐवजी हे सूप प्यावे.

साहित्य

दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, लसूण, आलं, काळीमिरी पावडर, टोमॅटो, जिरं, तूप आणि कोथिंबीर.

कृती

सर्वप्रथम भाज्या स्वच्छ धुवून मध्यम आकारात कापून घ्या. कुकरच्या भांड्यात तूप गरम करून त्यात आलं आणि लसूण घालून मध्यम आचेवर भाजा. त्यानंतर त्यात कापून घेतलेल्या भाज्या, टोमॅटो आणि कोथिंबीरीचे दांडे घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून भाज्या शिजण्यासाठी ठेवा. कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या काढा. कुकर थंड झाल्यानंतर सर्व भाज्या चाळणीच्या मदतीने बारीक मॅश करा. मॅश केल्यामुळे शेवग्याच्या शेंगांमधील अर्क व्यवस्थित निघेल. टोपात तूप गरम करून त्यात जिरं घाला आणि वरून तयार केलेली पेस्ट घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी, चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून सूपला उकळी काढून घ्या. तयार आहे झटपट बनवलेले दुधी भोपळा आणि शेवग्याचे सूप.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance