पाकिस्तानने आज फतह-3 या सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे पाकिस्तानची ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतासाठी ही चिंता वाढवणारी बाब ठरू शकते.
चाचणीच्या वेळी कोण उपस्थित होते
ही चाचणी आर्मी रॉकेट फोर्स कमांडचे कमांडर, वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक आणि इंजिनिअर यांच्या उपस्थितीत पार पडली. चाचणीचे महत्त्व लक्षात घेता वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या वेळी उपस्थित होते.
भारताकडे उत्तर तयार
दरम्यान, भारताकडे हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी उत्तर तयार असल्याचे सांगितले जात आहे. भारताकडे एस-400 ही व्यवस्था असल्यामुळे पाकिस्तानच्या या चाचणीला प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे.
Leave a Reply