छत्रपती संभाजीनगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानात नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद व्हावा, या उद्देशाने ठाकरे उद्यान मित्रमंडळातर्फे दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने उद्यानाचा विकास आणि परिसरातील नागरी समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
लोकप्रतिनिधींची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक राजगौरव वानखेडे, किशोर नागरे, पुष्पा रोजतकर, सुवर्णलता साळवे यांच्यासह माजी नगरसेविका स्वाती नागरे, रमण साहुजी, ग. मा. पिंजरकर, सागर पाले व शुभम गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिद्नेश खंडाळकर व पल्लवी शहा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स. सो. खंडाळकर यांनी प्रास्ताविक केले.
उद्यान विकास आणि नागरी समस्यांवर चर्चा
उद्यानाचे सुशोभीकरण, स्वच्छता, हिरवळ, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा, व्यायामाची साधने तसेच परिसरातील रस्ते, पाणी आणि ड्रेनेज समस्यांबाबत नागरिकांनी सूचना मांडल्या. त्यावर प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राजगौरव वानखेडे यांनी अध्यक्षीय समारोपात दिले. सूत्रसंचालन मोहन भोमे यांनी, तर आभार बाबुराव रणयेवले यांनी मानले. कार्यक्रमासाठी रवींद्र भाले, बी. झेड. पाटील, रायभान पाटील, राजेंद्र जैस्वाल, शोभा शिनगिरवार, रेखा दाभाडे, महेंद्र डेरे, अशोक साळवे, प्रशांत वैद्य, जगदीश पुरी, रजनी रामगीरवार यांनी पुढाकार घेतला.
Leave a Reply