तुमचे खाते आयसीआयसीआय बँकेत असेल, आणि तुम्ही परदेशात राहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँकेने परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या (NRI) सेव्हिंग अकाऊंटशी संबंधित काही सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होतील, तर कॅश व्यवहारांवरील वाढीव शुल्क १ डिसेंबरपासून लागू होईल. याचा परिणाम NRI सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना पडणार आहे.
## कॅश व्यवहारांवर किती शुल्क?
आतापर्यंत निश्चित फ्री लिमिटहून जास्त कॅश जमा वा काढण्यावर दर १,००० रुपयांवर ३.५० रुपये चार्ज लागत होता. १ डिसेंबरपासून याला वाढवून ४ रुपये करण्यात आला आहे. आता १,००० रुपयाला ४ रुपये लागणार आहेत. मात्र, किमान चार्ज १५० रुपये राहणार आहे. म्हणजेच कितीही कमी व्यवहार केला, तरी कमीत कमी १५० रुपये कापणारच.
साधारण NRI सेव्हिंग अकाऊंटमध्ये दर महिन्याला ३ वेळा कॅश जमा करणे आणि काढणे मोफत असेल. कॅश जमा करणे आणि काढण्याची मर्यादा १ लाख रुपये असेल. ३ वेळा झाली, किंवा १ लाख पार झाला, की मग बँकेचा नवा चार्ज लागू होईल.
## कोणाला मिळणार जास्त सूट?
NRI प्रायव्हेट बँकिंग आणि प्रीमियम कॅटेगरीच्या काही ग्राहकांना साधारण खातेधारकांच्या तुलनेत जास्त सूट मिळेल. यासाठी ग्राहकाने बँकेत किमान एक कोटी रुपयांची एकूण रिलेशनशिप व्हॅल्यू ठेवावी लागेल. गेल्या तीन महिन्यांपैकी कोणत्याही एका महिन्यात खात्यात २५ लाख रुपये वा त्याहून जास्त डिपॉझिट आणि बॅलन्स असायला हवे.
अशा योग्य ग्राहकांना दर महिन्याला एकूण १५ व्यवहार मोफत मिळतील. याशिवाय कॅश जमा आणि काढण्यासाठी वेगवेगळी १५ लाख रुपयांपर्यंत मोफत लिमिट मिळेल. पैसा टाकायला १५ लाख फ्री, काढायला १५ लाख फ्री. या लिमिटहून जास्त व्यवहार केल्यानंतर दर १,००० रुपयांवर ४ रुपये वा किमान १५० रुपये चार्ज लागेल.
## ECS फेल झाल्यास दंड
ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसद्वारे बँक खात्यातून आपोआप होणारे पेमेंट. EMI, विम्याचे हप्ते वा दुसरे नियमित खर्च ECS ने होतात. जर खात्यात पुरेसे पैसे नसतील किंवा दुसऱ्या आर्थिक कारणाने पेमेंट फेल झाले, तर बँक ५०० ते ५५० रुपये चार्ज वसूल करेल.
हा बदल आयसीआयसीआय बँकेच्या NRI प्रायव्हेट बँकिंग, NRI प्रीमियम, NRI सिलेक्ट, NRI प्रो, NRI रेग्युलर, सीफेयरर, वर्च्यु आणि NRI स्पर्श या खात्यांना लागू होईल. हे बदल ४ ऑगस्ट २०२५ च्या आधी उघडलेल्या खात्यांनाही लागू होणार आहेत. त्यामुळे खात्यात पुरेसा पैसा ठेवा आणि फ्री लिमिट लक्षात ठेवा, नाहीतर विनाकारण चार्ज लागेल.
Leave a Reply