माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.
प्रसन्न चेहरा पुतळ्यावर कोरला
अजित पवार यांची ओळख एक प्रसन्न नेता आणि कडक प्रशासक अशी होती. निवडणुकीच्या काळातील त्यांची भाषणे सोशल मीडियावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर पाहिली जात होती. त्यांचा हाच प्रसन्न चेहरा पुणे जिल्हा परिषदेत उभारलेल्या पुतळ्यावरही कोरलेला आहे.
सुनेत्रा पवार भावूक
अनावरणाच्या सोहळ्यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या. अजित पवार यांच्या आठवणींना या सोहळ्यात उजाळा मिळाला.
Leave a Reply