म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली २३ वा लोकशाही दिन पार पडला. या लोकशाही दिनात पुणे आणि मुंबईतील एकूण सात अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
सात अर्जांवर सुनावणी
नागरिकांच्या सदनिका ताबा, वाढीव शुल्क आणि पुनर्विकासाच्या तक्रारींवर या सुनावणीत चर्चा झाली. प्रत्येक अर्जावर सविस्तर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्यात आला.
तक्रारींवर तात्काळ कारवाईचे निर्देश
सदनिका ताबा, वाढीव शुल्क आकारणी आणि पुनर्विकासासंबंधीच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाढीव शुल्क आकारणाऱ्या विकासकावरही कारवाई करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.
Leave a Reply