तरुण आणि लहान मुलं मोबाईलच्या आहारी जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून नेहमी ऐकायला मिळतात. मात्र आता वृद्ध मंडळीही मोबाईलच्या वेडापायी अडचणीत सापडत असल्याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका ७५ वर्षीय आजीबाई इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याच्या इतक्या आहारी गेल्या की त्यांना तहान-भूक आणि दैनंदिन व्यवहारांचंही भान राहिलं नाही. दिवसातून सुमारे १८ तास त्या मोबाईलच्या स्क्रीनसमोर घालवू लागल्या.
मोबाईल काढल्यावर आदळआपट
आजीबाईंची ही सवय पाहून कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी आजींकडून मोबाईल काढून घेतला. मात्र त्यानंतर आजींनी घरात आदळआपट सुरू केली. त्यांची अवस्था पाहून कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयातही मोबाईलचं वेड कायम
रुग्णालयात उपचार सुरू असतानाही आजींचं मोबाईलचं वेड थांबलं नाही. उपचारादरम्यान त्यांनी तिथल्या पाच रुग्णांचे मोबाईल स्वतःच्या पिशवीत ठेवले. ही घटना समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी आजींना समजावलं.
ही घटना मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम आता वृद्धांनाही भोगावे लागत असल्याचं दाखवते.
Leave a Reply