बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

केळीच्या सालींपासून पॉलिशिंग; ओम जाधवची राज्यस्तरावर निवड

धुळ्याचा विद्यार्थी ओम जाधव याने केळीच्या सालींपासून पर्यावरणपूरक पॉलिशिंग तयार केले. 'अविष्कार' संशोधन स्पर्धेत पदक मिळवल्यावर त्याची राज्यस्तरावर निवड झाली.

केळीच्या सालींपासून पॉलिशिंग; ओम जाधवची राज्यस्तरावर निवड

धुळे, ता. १६ : टाकाऊ केळीच्या सालींपासून पर्यावरणपूरक पॉलिशिंग उत्पादन विकसित केल्याबद्दल धुळे एसव्हीकेएम फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओम दीपक जाधव याने ‘अविष्कार’ विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत पदक पटकावले. या यशाच्या बळावर त्याची राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (डी बाटू) प्रतिनिधित्व करणार आहे.

नाशिकमधील स्पर्धेत अभिनव प्रकल्प

नाशिक येथील आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे झालेल्या या स्पर्धेत ओमने ‘डेव्हलपमेंट ऑफ अँन इको-फ्रेंडली पॉलिशिंग प्रॉडक्ट फ्रॉम वेस्ट बनाना पिल्स’ हा अभिनव प्रकल्प सादर केला. प्रा. डॉ. प्रफुल्ल शिंदे यांच्या मार्गदर्शनात विकसित केलेल्या या प्रकल्पातून जैविक कचऱ्याचा पुनर्वापर आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला आहे. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणावरील कचऱ्याचा भार कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे.

संस्थेकडून कौतुक

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष चिंतन पटेल, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पसचे अध्यक्ष संजय अग्रवाल, मार्गदर्शक डॉ. अजय पसारी, कुलगुरू डॉ. अंकुर कुलकर्णी, कुलसचिव डॉ. हर्षल साळुंखे, प्राचार्य डॉ. समीर गोयल यांनी ओम जाधव व प्रा. डॉ. प्रफुल्ल शिंदे यांचे कौतुक केले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance