मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

गोहत्याबंदी कायदा, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा

तीर्थपुरीत गोहत्याबंदी कायदा व गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कार्यक्रम झाला. देशभरातून ३३ कोटी स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे.

गोहत्याबंदी कायदा, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा

गोहत्येला पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात गोहत्याबंदी कायदा लागू करावा आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या ‘गो सन्मान व आव्हान अभियाना’अंतर्गत तीर्थपुरी येथील दुर्गादेवी मंदिरात रविवारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत संगमजी महाराज यांच्या हस्ते जनजागृती पत्रकाचे वितरण करण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरात गोमातेचे संरक्षण, गोहत्याबंदी आणि गोसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी जालना येथील महंत श्री संगमदाजी महाराज यांच्यासह तीर्थपुरीतील साधू-संत, महाराज, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३३ कोटी स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट

देशभरात गोहत्याबंदीचा कठोर कायदा लागू करावा आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात २० लाख, महाराष्ट्रात १० कोटी, तर संपूर्ण देशभरातून ३३ कोटी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

येत्या १ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर या अभियानाचा भव्य प्रारंभ होणार आहे. संकलित स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे गोहत्याबंदी कायदा लागू करण्यासह गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. या मागणीसाठी देशभरातील साधू-संत, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे.

सर्व घटकांकडून सहकार्याची अपेक्षा

गोमातेचे संरक्षण ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संघटनेची जबाबदारी नसून, त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने या अभियानाची आणि जनभावनेची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance