मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

आळेफाटा बाजारात ४,७२५ गोण्या कांद्याची आवक

आळेफाटा बाजारात रविवारी कांद्याची ४,७२५ गोण्यांची आवक झाली असून २,३६२ क्विंटल विक्री झाली. गोळा कांद्याला प्रतिदहा किलो ४६१ ते ४९५ रुपये भाव मिळाला आहे.

आळेफाटा बाजारात ४,७२५ गोण्या कांद्याची आवक

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या आळेफाटा येथील दुय्यम बाजार आवारात रविवारी कांद्याची ४ हजार ७२५ गोण्यांची आवक झाली. त्यातून २ हजार ३६२ क्विंटल कांद्याची विक्री झाली. बाजारात गोळा कांद्याला प्रतिदहा किलोला ४६१ ते ४९५ रुपये, तर सुपर कांद्याला ४२० ते ४६० रुपये बाजारभाव मिळाला.

गोल्टी आणि गोल्टा कांद्याला ३५० ते ४०० रुपये, तर बदला व चिंगळी कांद्याला १७० ते ३४० रुपये भाव मिळाला. दरम्यान, नवीन कांद्याची २३५ गोण्यांची आवक झाली असून, त्याला प्रतिदहा किलोला २०० ते ४५१ रुपये बाजारभाव मिळाला.

गावरान कांदा संपत आला; नवीन लाल कांद्याची आवक सुरू

गेल्या दीड महिन्यापासून साठवून ठेवलेला गावरान कांदा आता संपत आल्याने बाजारातील त्याची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचवेळी पावसाळी हंगामातील नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत गावरान कांद्याची आवक आणखी घटून नवीन लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाल्याने आगामी काळात बाजारभावात काय बदल होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च विचारात घेता कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ही माहिती बाजार समितीचे सभापती ॲड. संजय शिवाजीराव काळे, उपसभापती निवृत्ती मुरलीधर काळे, सचिव रूपेश कवडे, संचालक प्रीतम काळे आणि कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance