मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळी संपताच मुंबईकडे परतणाऱ्यांची अलिबागमध्ये गर्दी

दिवाळीच्या सुट्ट्या संपताच अलिबागहून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली आहे. मांडवा बंदरातील जलवाहतूक हाउसफुल असून एसटी आगारातही प्रवाशांची गर्दी आहे.

दिवाळी संपताच मुंबईकडे परतणाऱ्यांची अलिबागमध्ये गर्दी

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह विविध भागांतून हजारो पर्यटक अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात आले होते. सुट्ट्या संपल्यावर हे पर्यटक पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले असून अलिबागमध्ये परतीच्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कमी वेळेत मुंबई गाठण्यासाठी अनेक प्रवाशांनी जलवाहतुकीला पसंती दिली आहे. थंडीची चाहूल लागल्याने मुंबईकडून मांडवा बंदरातून अलिबागकडे जाणारी जलवाहतूकही हाउसफुल झाली आहे.

मांडवा जेट्टीवर तिकीटासाठी लांब रांगा

मांडवा जेट्टीवर रविवारी आणि सोमवारी सकाळपासूनच तिकीट खरेदीसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान धावणाऱ्या लाँच, बोटी आणि रो-रो (एमटूएम फेरी) सेवाही प्रवाशांनी गच्च भरून धावत आहेत.

एसटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

दुसरीकडे अलिबाग एसटी आगारातही मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे अपेक्षित होते, मात्र अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

विनाथांबा बससेवेचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात गर्दीच्या वेळी अतिरिक्त गाड्याच उपलब्ध नसल्याने ही सेवा केवळ नावापुरतीच असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जलवाहतूक हाउसफुल आणि एसटी बसची प्रतीक्षा अशा दुहेरी परिस्थितीत प्रवाशांची कोंडी झाली असून सणासुदीच्या काळात अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करूनही प्रवाशांचा खोळंबा होत असल्याने एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance