मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दुष्काळाच्या विळख्यात केळीची बाग; रोटावेटर फिरवण्याची वेळ

करमाळा तालुक्यात पावसाअभावी भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. फिसरे येथील शेतकऱ्याची दीड एकर केळीची बाग सुकत असून, बागेवर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे.

दुष्काळाच्या विळख्यात केळीची बाग; रोटावेटर फिरवण्याची वेळ

यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहिले आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून असलेली फळबागा व नगदी पिके धोक्यात आली आहेत. फिसरे गावातील शेतकरी नागेश काटे यांच्या दीड एकर क्षेत्रातील केळीची बागही पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. जिवापाड वाढवलेल्या या बागेवर रोटावेटर फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

काटे यांनी चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने दीड एकर क्षेत्रावर जैन जातीच्या केळीची लागवड केली होती. सुरुवातीला बोअरवेलला पुरेसे पाणी असल्याने पीक जोमात आले, बाग हिरवीगार झाली आणि उत्पादनाच्या आशाही वाढल्या. मात्र पावसाअभावी भूगर्भातील पाणीपातळी खालावली आणि बोअरवेलचे पाणी कमी झाले. त्यामुळे भरात आलेल्या केळीला पुरेसे पाणी देणे अशक्य झाले.

## नवीन बोअरवेलही कोरडीच; विकतच्या पाण्याचा खर्च वाढला

पीक वाचविण्यासाठी काटे यांनी नवीन बोअरवेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातूनही अपेक्षित पाणी मिळाले नाही. त्यानंतर विकतचे पाणी घेऊन काही दिवस बाग जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वाढता खर्च आणि लागवडीसाठी केलेली गुंतवणूक यामुळे आर्थिक गणित कोलमडले. पीक जगविण्यासाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळली आहे.

## व्यापाऱ्यांकडून कमी भावाची मागणी

दुसरीकडे पाण्याअभावी केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने व्यापारीही कमी भावाने माल मागू लागले आहेत. एवढा खर्च करूनही उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे डोळ्यांसमोर वाढविलेली बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. हातातोंडाशी आलेले पीक सोडून देत केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवण्याचा कठीण निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेतकऱ्याने नेमके करायचे तरी काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance