करकंब (ता. पंढरपूर) येथील फेस्टिव्हलमध्ये आयोजित अटीतटीच्या होम मिनिस्टर स्पर्धेत कोमल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मोनल शाह, दीपाली जाधव, हर्षदा भोसले आणि अश्विनी रेडे यांनी अनुक्रमे द्वितीय ते पाचवा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत १५० महिलांनी सहभाग नोंदविला.
निवेदक नाना बारामतीकर यांनी विविध खेळ, उखाणे आणि नृत्याच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थित महिलांच्या उत्साहात स्पर्धा पार पडली.
विजेत्यांना पैठणी आणि भेटवस्तू
पहिल्या दोन विजेत्यांना पैठणी व भेटवस्तू, तर अन्य तीन विजेत्यांना साडी, नथ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्यात आल्या. उपस्थित महिलांसाठी चिठ्ठीद्वारे सचिन हराळे यांच्या वतीने २५, तर फिरोज प्लंबिंगच्या वतीने १५ बक्षिसे देण्यात आली. चेअरमन सचिन हराळे आणि नाना बारामतीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धेतही उत्साह
दरम्यान, शुक्रवारी (१३) सकाळी महादेव मंदिरात आयोजित रांगोळी स्पर्धेत ६३ महिलांनी सहभाग घेतला. इंजिनिअर अशोकसिंह देशमुख आणि अल्ताफ कोरबू यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. महिलांनी रांगोळ्यांतून विविध सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबरच शुभसंदेशही दिले, त्यामुळे या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
Leave a Reply