घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत जास्वंदाचे झाड असेल, तर त्याला भरपूर फुले यावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. जास्वंदाची लाल, पिवळी, गुलाबी आणि पांढरी फुले घराच्या सौंदर्यात भर घालतात. मात्र अनेकदा झाडाची पाने हिरवीगार असतात, पण त्याला फुले येत नाहीत. कधी कळ्या लागतात, पण त्या उमलण्याआधीच गळून पडतात.
झाडाला योग्य खत, पाणी आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे अशी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे झाडाची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. बाजारातून महागडी खते आणण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेल्या सेंद्रिय खतांचाही वापर करता येतो. बागकाम तज्ज्ञांनी जास्वंदाच्या झाडाची वाढ चांगली होण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.
सेंद्रिय खताचा वापर
जास्वंदाच्या झाडाला नियमित सेंद्रिय खत दिल्यास त्याची वाढ सुधारते आणि फुले येण्याचे प्रमाण वाढते. घरच्या घरी तयार केलेले सेंद्रिय खत झाडासाठी सुरक्षित आणि प्रभावी मानले जाते. खत देताना प्रमाण योग्य ठेवणे महत्त्वाचे असते, कारण जास्त खतामुळे झाडाला नुकसानही होऊ शकते.
पाणी आणि सूर्यप्रकाश
झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. जास्वंदाचे झाड सूर्यप्रकाशात चांगले वाढते. पाणी देताना माती ओली राहील याची काळजी घ्यावी, पण पाणी साचून राहणार नाही याकडेही लक्ष द्यावे. योग्य खत, पाणी आणि सूर्यप्रकाश या तिन्ही गोष्टींचा समतोल राखल्यास झाड अवघ्या काही दिवसांत बहरून येऊ शकते.
Leave a Reply