मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. पुणे लिट फेस्टमध्ये एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी सोशल मीडियावर राजकीय व्यंगचित्रकारांची खाती बॅन आणि ब्लॉक करण्याच्या प्रकारावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.
व्यंगचित्रांचं लोकशाहीतील महत्त्व
लोकशाहीत व्यंगचित्रांना मोठं महत्त्व असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. एखाद्या देशातील लोकशाही किती सक्षम आहे, हे तिथल्या व्यंगचित्रांवरून कळतं, असं त्यांचं मत आहे. जुन्या काळातील नेते व्यंगचित्रांकडे कसे पाहायचे, यावरही त्यांनी भाष्य केलं.
हिटलरचाही संदर्भ
व्यंगचित्रांचं स्थान अधोरेखित करताना ठाकरे यांनी हिटलरचाही संदर्भ दिला. हिटलरही व्यंगचित्राला घाबरला होता, असं ते म्हणाले. दिवंगत पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या एका किस्स्याचाही त्यांनी उल्लेख केला.
Leave a Reply