राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसकडून संघटनावाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कथित मतचोरी आणि एसआयआरच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारविरोधात गंभीर आरोप करत आहेत. राज्यातही काँग्रेसकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मुंडे नाव घुमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सपकाळ यांची भेट आणि चर्चा
राज्यात भाजपमध्ये मुंडे आहेत. आता काँग्रेसमध्येही एका मुंडेंची एन्ट्री होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. करुणा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय समीकरणांची नांदी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंडे नाव आता काँग्रेसमध्येही घुमणार का, असा सवालही केला जात आहे.
या भेटीनंतर करुणा मुंडे यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या भेटीमागचे नेमके कारण काय आणि करुणा मुंडे आगामी काळात कोणती राजकीय भूमिका स्वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत करुणा मुंडे?
करुणा मुंडे यांचे आधीचे नाव करुणा शर्मा असे आहे. त्या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात अनेक पुरावे सादर केल्याचे सांगितले जाते. या कागदपत्रांमध्ये स्वीकृतीपत्र, अंतिम इच्छापत्र आणि कौटुंबिक कागदपत्रांचा समावेश आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत. त्या सामाजिक आणि राजकीय पक्षाचे कामकाजही सांभाळतात.
धनंजय मुंडे यांच्याशी २७ वर्षांहून अधिक काळ संबंध असल्याचा त्यांचा दावा आहे. या दाव्यावरून त्यांनी करुणा शर्मा हे नाव बदलून करुणा धनंजय मुंडे असे केले आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्या कायदेशीर पत्नी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु धनंजय मुंडे यांच्याकडून हक्क नाकारला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply