शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नाशिकमध्ये ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ

नाशिकमध्ये ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यंदा २३ संघ सहभागी; अंतिम फेरीसाठी दोन नाटकांची निवड होणार; स्पर्धा ८ डिसेंबरपर्यंत राहणार.

नाशिकमध्ये ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सोमवारपासून (ता. १६) प्रारंभ होत आहे. नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार असून दररोज सायंकाळी सातला प्रेक्षकांना ही नाटके पाहता येणार आहेत. स्पर्धा ८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

यंदा २३ संघ; अंतिम फेरीसाठी दोन नाटके

गेल्यावर्षी स्पर्धेत पाच महिला दिग्दर्शिकांचा सहभाग होता, तर यंदा ती संख्या तीनवर आली आहे. आरती हिरे, आशा भोईर आणि पल्लवी पटवर्धन या तीन महिला दिग्दर्शकांची नाटके यंदा स्पर्धेत असणार आहेत. ६४ व्या स्पर्धेत २५, तर ६३ व्या स्पर्धेत २६ प्रवेशिका आल्या होत्या. यंदा प्रवेशिका २३ वर आल्याने नियमानुसार अंतिम फेरीसाठी दोन नाटकांची निवड केली जाणार आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक

सोमवार (ता. १६) अनुभव मंटप, मंगळवार (ता. १७) पिवळी भिंत, बुधवार (ता. १८) दाह, गुरूवार (ता. १९) केअरटेकर, शुक्रवार (ता. २०) खेळ, शनिवार (ता. २१) शेवंता जित्ती हाय, रविवार (ता. २२) मृत्यू आधीच आला होता, सोमवार (ता. २३) सलवा जुडूम, मंगळवार (ता. २४) एक धुरंदर तीन बिलंदर, बुधवार (ता. २५) कातळवेल, गुरूवार (ता. २६) आमचा काळ मस्त होता, शुक्रवार (ता. २७) कळी बंद पाऊस, शनिवार (ता. २८) एक्सपायरी डेट, रविवार (ता. २९) श्याम तुझी आऊस इली रे, सोमवार (ता. ३०) द रेड पेन ड्राईव्ह, मंगळवार (ता. १) बाग बेंच आणि बरेच काही, बुधवार (ता. २) नेटवर्क प्रॉब्लेम, गुरूवार (ता. ३) मेले कोण, शुक्रवार (ता. ४) हमिदाबाईची कोठी, शनिवार (ता. ५) रघुनाट्य @ ब्लॉगपोस्ट, रविवार (ता. ६) नथिंग टू से, सोमवार (ता. ७) आता कोठे धावे मन आणि मंगळवार (ता. ८) लेडीज सायकल या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance