अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
२१ पैकी १८ जागांवर विजय
या निवडणुकीत विखे-थोरातांच्या सहकार विकास आघाडीने २१ पैकी तब्बल १८ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. २१ पैकी १८ जागा जिंकून सहकार विकास आघाडीने जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवला आहे.
शिर्डी आणि अहिल्यानगरमध्ये जल्लोष
या विजयानंतर शिर्डी आणि अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडत, घोषणाबाजी करत आणि गुलाल उधळून आनंद साजरा केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply