लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरात ऐन दिवाळीत घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे घरातील महिला काकड आरतीला गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने घरात घुसून तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
## सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला
आणखी वाचा ·चाकणमध्ये एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण
चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. एकूण १४ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. दिवाळीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
## सीसीटीव्हीतील दृश्य महत्त्वाचं
घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमुळे पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. त्या दृश्यांच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply