दिवाळीच्या काळातही राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीसाठी त्यांनी वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पवार-पटेल भेटीनंतर चर्चा
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू झाल्याचे दिसत आहे. प्रफुल पटेल यांच्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांना भेटणार आहेत.
ही बातमी आताच समोर आली असून त्याबाबत अधिक तपशील येणे बाकी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply